breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे ‘डाकपे’ अ‍ॅप भारतीयांच्या सेवेत

नवी दिल्ली – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि टपाल विभाग (डीओपी) यांनी मिळून त्यांचे डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाकपे’ सुरू केले. हे अॅप सुरू करीत मंत्रालयाने म्हटले आहे की, देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल व्यवहारांसाठी हे अॅप सुरू करण्यात आले आहे.

डाकपे इंडिया टपाल नेटवर्क व आयपीपीबी डिजिटल फायनान्शियल व असिस्टेड बँकिंग सर्व्हिसेस यासारख्या वैशिष्ट्यांसह पोस्टल नेटवर्कद्वारे ऑफर करते.

वाचा :-जेईई मेन 2021 परीक्षांच्या तारखांची घोषणा

१. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात. याशिवाय तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसेही पाठवू शकता. व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवू शकता.
२. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल. याद्वारे, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. युटिलिटी बिल देखील तुम्ही भरु शकता.
३. याद्वारे बँकिंग सेवा आणि टपाल उत्पादनांचा ऑनलाईन लाभ घेता येईल. या माध्यमातून ग्राहक टपाल आर्थिक सेवा घर बसल्या घेऊ शकता.

वाचा :-GOOD NEWS! लसीकरणाला लवकरच सुरूवात होणार; केंद्राने राज्यांना लसीकरण मोहिमेसंदर्भात दिल्या मार्गदर्शक सूचना…

या अ‍ॅपच्या लाँचिंगवेळी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या संकटाच्या काळातसुद्धा घरात लोकांना AePS आर्थिक सेवा देऊन त्यांनी बँकिंग प्रणालीपासून बरेच दूर असलेल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जय वेंकटरामु म्हणाले की, ‘डाकपे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आमचे उद्दीष्ट हे – प्रत्येक ग्राहक महत्वाचे आहे, प्रत्येक व्यवहार महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक ठेव मौल्यवान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button