breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: “माझ्यासाठी व्हेंटिलेटर वापरु नका तो एखाद्या तरुण रुग्णासाठी ठेवा”; सांगत कोरोनाग्रस्त महिलेने सोडले प्राण

बेल्जियममधील एका ९० वर्षीय करोनाग्रस्त महिलेने उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मत्यू झाला आहे. डॉक्टरांनी माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्याऐवजी तरुण रुग्णांसाठी तो ठेवावा असं सांगत या महिलेने उपचारांना नकार दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे.

लुबेक येथील बिनकोम शहरातील सुझॅन होलर्ट्स या महिलेला तिची मुलगी जुडीथ डॉक्टरांकडे घेऊन आली. सुझॅन यांना भूक लागत नव्हती तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. सुझॅन यांची करोना चाचणी घेण्यात आली ती पॉझिटीव्ह निघाली. करोना झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे सुझॅन यांना विलगीकरणात ठेवण्यात आला. त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं. “माझ्यासाठी कृत्रिम श्वसन यंत्रणा वापरु नका. जी यंत्रणा माझ्यासाठी वापरणार होते तिचा एखाद्या तरुण रुग्णासाठी त्याचा वापर करा. मी माझं आयुष्य छान जगले आहे,” असं सुझॅन यांनी डॉक्टरांना सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button