breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एक तास स्वच्छता उपक्रम

उपक्रमात सहभागी व्हा; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक तास स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील सर्व आस्थापना, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, विद्यार्थी, मंडळे, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांनी स्वच्छता हीच सेवा या राष्ट्रीय अभियानांतर्गत १ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत शहरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

रविवारी (दि. १ ऑक्‍टोबर) शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये एक तास स्वच्छतेसाठी उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरी सहभागातून कचरा संकलनाच्या व्यापक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आज विविध विभागांसमवेत आढावा बैठक घेतली.

हेही वाचा – Bank Holiday : ऑक्टोबर महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उपायुक्त अजय चारठाणकर, सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त म्हणाले की, एक तास स्वच्छतेसाठी मोहिमेमध्ये नागरी सहभाग महत्वाचा कणा आहे. लोकप्रतिनिधींसह विविध घटकांतील प्रतिनिधींचा सहभाग असावा. मोहिमेचे नियोजन करताना आखणी, व्यवस्थापन आणि नियोजन योग्य करावे. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट, स्वच्छतादूत तसेच अधिकारी, कर्मचारी, अशासकीय व शासकीय संस्था, औद्योगिक कंपन्या, रिक्षा संघटना, टपरी, पथारी हातगाडी संघटना, फेरीवाले, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, पर्यावरण प्रेमी, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आदींना सहभागी करून घ्यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button