breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढीवारी , ४ ते २२ जुलैदरम्यान विठ्ठल मंदिर २४ तास खुले

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर येथील विठ्ठल-रक्मिृणी मंदीर 4 ते 22 जूलैदरम्यान 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारक-यांना दर्शन घेता येणार आहे.

आषाढीवारी सोहळ्यानिमित्त जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपुरकडे मार्गस्त झाल्या आहेत. लाखो वारकरी मुखी ज्ञानबा-तुकोबाचा जयघोष करीत विठुरायाचा दर्शनासाठी निघाले आहेत.

आषाढी एकादशीची मुख्य यात्रा १२ जुलैला होणार आहे. या निमित्ताने १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल होण्याचा अंदाज आहे. या सर्वांना दर्शन घेता यावे म्हणून ४ ते २२ जुलै दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २४ तास खुले राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button