breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! एका चोरामुळे १७ पोलीस, न्यायाधीश आणि कोर्टातील कर्मचाऱ्यांवर क्वारंटाइन होण्याची वेळ

पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या चोराला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर १७ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लुधियानामध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. फक्त पोलीस कर्मचारी नाही तर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचारी यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पोलिसांनी वाहनांची चोरी करणाऱ्या २५ वर्षीय सौरव सेहगल अटक करुन ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केल होतं. जीवन नगर पोलीस ठाण्यात त्याला एका दिवसासाठी बंदिस्तही ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी दोन स्थानिकांच्या मदतीने चोराला अटक केली होती. पण त्याला करोना झाल्याचं निष्पन्न होताच त्याच्या कुटुंबातील ११ जणांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

६ एप्रिल रोजी न्यायाधीशांना सौरव सेहगलला ताप आणि खोकला असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. यावेळी सौरवला करोना असल्याचं चाचणीत स्पष्ट झालं. यानंतर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button