breaking-newsपिंपरी / चिंचवड

अधिकारी, कर्मचा-यांनी निवृत्तीचे जीवन आनंदात जगावे – विलास मडिगेरी

पिंपरी, (महाईन्यूज) – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी विविध ट्रस्ट, सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय रहावे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देऊन आपले निवृत्तीचे जीवन आनंदात जगावे, असे मत स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी व्यक्त केले.

  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून जून २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या ३८ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे झालेल्या कार्यक्रमास उपमुख्य लेखापरीक्षक किशोर शिंगे व कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी विजयकुमार इंगुळकर, मुख्याध्यापक उत्तरा कांबळे, चिंधा उंबरे, उपलेखापाल बाजीराव ओंबळे, कार्यालयीन अधिक्षक लतिका पारठे, श्रीकांत बेलसरे, शामराव भोसले, सहाय्यक शिक्षक निर्मला पठारे, उपशिक्षक विजय ओतारी, पद्मा कुंभारे, सुनंदा चव्हाण, मुख्य लिपिक निर्मला भालेराव, वाहनचालक मनोहर आरु, परमात्मा बनसोडे, बाळासाहेब कांबळे, असिस्टंट मेट्रन माया गायकवाड, इले.मोटार पंप ऑपरेटर बबन कोबल, रखवालदार सन्तु मराठे, दिलीप घुंडरे, राहुल गायकवाड, लिफ्टमन हसन शेख, शिपाई पंडित नाणेकर, सुरेश काकडे, वॉर्ड बॉय बाबु भूसाळे, मजूर सोन्याबापू गुजर, नागू केमसे, सफाई कामगार सावम्मा अनेपगोल, लाडबाई मोटा, ताराबाई पंचमुख, यशोदा सुर्यवंशी, गटारकुली मोहन डोळस, शिक्षिका अलका नेमाडे तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सफाई कामगार निर्मला बहुले, शोभा खराडे, चंद्रभागा गवारे, गटार कुली विश्वनाथ माछरे, भारत जगजाप, ए.एन.एम. मार्गारेट साठे आदींचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button