ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी एकाला अटक

पिंपरी चिंचवड | शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास स्काय लाईन जनरल स्टोअर्स नावाच्या टपरीत करण्यात आली.रशीद हुसेन शेख (वय 50, रा. आदर्श नगर कॉलनी, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार नितीन माणिकराव लोंढे यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कायलाइन जनरल स्टोअर्स नावाच्या टपरीमध्ये आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास दिघी येथे स्कायलाइन जनरल स्टोअर्स नावाच्या टपरीवर छापा टाकून ही कारवाई केली. यामध्ये 16 हजार 800 रुपयांचा गुटखा व दोन हजार 665 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button