breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अबब…आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, ‘महावितरण’चे उत्तर…

मुंबई: गेल्या तीन-चार महिन्यात वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता प्रख्यात गायिका आशा भोसले यांनीही तक्रार केलेली आहे. लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार भोसलेंनी केलेली आहे. आपल्याला जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आल्याची तक्रार आशा भोसले यांनी ‘महावितरण’कडे केल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिलेले आहे. लोणावळ्यात असलेल्या आशा भोसले यांच्या बंगल्याचे हे बिल आहे. मात्र हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा ‘महावितरण’ने केला आहे.

आशा भोसले यांना मे महिन्याचे बिल 8 हजार 855 रुपये, तर एप्रिलचे बिल 8 हजार 996 रुपये इतके आले होते. बिलावरील नोंदीनुसार गेल्या जून महिन्यातही त्यांना 6 हजार 395 रुपये बिल आलेल होते. त्यामुळे हे वाढीव दोन लाख रुपये कसले, असा सवाल विचारला जात आहे.

“आशा भोसले यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत पुण्यातील वरिष्ठ अधिकारी स्वतः रीडिंग चेक करण्यासाठी बंगल्यात गेले होते. त्यावेळी मीटर योग्य असल्याचे दिसून आले, म्हणजेच बिलही योग्य आहे” असं ‘महाडिस्कॉम’च्या प्रवक्त्यांनी सांगितल्याची माहिती ही आहे. “योग्य तपासणी केली असता आशा भोसले यांचा बंगला बंद नव्हता आणि तिथे काही चित्रीकरणेही सुरु होती” असेही सांगण्यात आले आहे. आशा भोसले यांची प्रतिक्रिया समजलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button