breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

धक्कादायक! रेशनचा तब्बल 110 टन तांदूळ साठा जप्त, गोण्यांवर पंजाब-हरियाणाचा शिक्का, काळाबाजाराचा पर्दाफाश

पनवेल: केंद्र सरकारकडून रेशन दुकानांमार्फत गरिब जनतेला दिल्या जाणाऱ्या तांदळाचा खुलेआम काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पनवेलचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणलेला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेक केयर लॉजिस्टिक पळस्पे येथील रेशन दुकानातच हा सर्व गैरप्रकार सुरु होता.

याप्रकरणी पोलिसांनी भीमाशंकर रंगनाथ खाडे, इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना या कारवाईत 33 लाख 8 हजार किंमतीचे तांदूळ मिळाले आहेत. पोलिसांना रेशनिंग तांदळाच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या एकूण 2 हजार 220 गोण्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे या गोण्यांवर पंजाब सरकार, हरियाणा सरकार, एशियन राईस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे शिक्के आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटेदेखील हस्तगत केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button