breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

आवास योजनेतील घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रणालीचे महापौरांच्या हस्ते अनावरण

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे. या योजनेसाठीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रणालीचे अनावरण महापौर उपा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर फ प्रभाग अध्यक्षा योगिता नगरगोजे, नगरसदस्य राजू मिसाळ, कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, स्मिता झगडे, सुनिल आलमेलकर, बाळासाहेब खांडेकर, संदीप खोत, सह शहर अभियंता अशोक भालकर, मकरंद निकम, कार्यकरी अभियंता प्रदीप पुजारी, उपअभियंता शेखर गुरव, अनघा पाठक आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेकरिता महापालिका सभा ठराव क्र .३ ९ . दि .२० / ०६ / २०१७ मंजूर आहे. सदर ठरावानुसार सद्यस्थितीत च होली, रावेत ब बोहाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प चालू आहेत. सदर प्रकल्पामध्ये १४ ते १५ मजली इमारतीमध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राच्या सदनिका बांधणेचे नियोजन आहे. सदर योजना ही खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे या घटकाचा अवलंब करुन राबविणेत येत आहे.

या घटकांतर्गत केंद्र शासनाकडून १.५ लक्ष व राज्य शासनामार्फत प्रति घरकुल र.रु .१ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील. पंतप्रधान आवास योजनेचे पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक नागरीकांना लाभ करुन देणेकामी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button