breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘आरोग्य सेवेतील ७३८ हंगामी डॉक्टरांना कायम करणार’

राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याबरोबरच डॉक्टरांना अधिकार दिले जातील.आरोग्य सेवेतील दहा हजार रिक्त पदे भरण्याबरोबरच आरोग्य संचालकांची दोन्ही पदे लवकर भरली जातील. प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षांनुवर्षे हंगामी म्हणून काम करणाऱ्या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना सेवेत कायम केले जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बालमृत्यू व मातामृत्यूदर कमी करून आदिवासी व दुर्गम भागात आरोग्यसेवा प्रभावी करण्याला  प्राधान्य असेल असे सांगितले.

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे पदमुक्त झाल्यानंतर आरोग्य सेवेचा कार्यभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी आज मंत्रालयात आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याला प्राधान्य राहील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करून ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी आरोग्य सेवा दिली जाईल असे त्यांनी  सांगितले. आरोग्य विभागासाठी दोन संचालक नेमण्याचा निर्णय गेल्या वर्षी होऊनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही याकडे लक्ष वेधले असता दोन्ही आरोग्य संचालकांची नियुक्त तात्काळ केली जाईल असे त्यांनी सांगितले. दोन पदांपैकी एक पद पदोन्नतीने भरले जाईल तर दुसरे पद राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले. सध्या आरोग्य संचालकांचा हंगामी कार्यभार आयुक्तांकडे असला तर राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार संचालकांच्या पदी डॉक्टरच असला पाहिजे व लवकरच त्याचाही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button