breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ८ हजार ६७६ कोटींचा आर्थसंकल्प सादर

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार ८४१ कोटी ९६ लाख तर केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला आज (दि.२०) सादर केला. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही.

विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला तात्काळ मान्यता दिली. महापालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप उपस्थित होते.

हेही वाचा     –      सरकारने दिलेलं आरक्षण टिकेल का? मनोज जरांगेंकडून शंका व्यक्त

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. सुरू असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला मोशी हॉस्पिटल, पिंपरी डेअरी फार्म पुल, सांगवी पूल आणि प्रशासकीय इमारत, निगडी पर्यंत मेट्रो, हरित सेतू, सिटी सेंटर, मोशी स्टेडियम वगळता असल्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प सुचविलेले नाहीत. पीपीपी तत्त्वावर प्राध्यान्य दिले जाणार आहे.

अर्थसंकल्पात काय आहे?

  • महापालिकेच्या विकास कामासाठी १८६३ कोटी तरतूद
  • आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी १९० कोटी
  • स्थापत्य विशेष योजनांसाठी १०३१ कोटी
  • शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी
  • महिलांच्या विविध योजनांसाठी ६१ कोटी
  • दिव्यांग कल्याकणारी योजना ६५ कोटी
  • पाणीपुरवठा २६९ कोटी
  • भूसंपादनाकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद आहे
  • अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेसाठी १० कोटी
  • अमृत २ योजनेसाठी ३० कोटी.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button