breaking-newsआंतरराष्टीय

११४ फायटर जेटचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी SAAB ‘ग्रिपेन’चे संपूर्ण पॅकेज द्यायला तयार

इंडियन एअर फोर्समधील अनेक स्क्वाड्रन निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भारताला नव्या फायटर विमानांची आवश्यकता आहे. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने विकत घेण्याचा करार केला असला तरी, त्याने गरज पूर्ण होणार नाहीये, मिग-२१ विमानांच्या अनेक स्क्वाड्रन्स पुढच्या काही वर्षात निवृत्त होतील. चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी सामना करण्यासाठी आपल्याला ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता आहे.

एअर फोर्सचे आधुनिकीकरण आणि फायटर विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत सरकारकडून लवकरच ११४ फायटर विमाने विकत घेण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. हा सर्व व्यवहार १५ अब्ज डॉलरच्या घरात आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकेची बोईंग, लॉकहीड मार्टिन, रशियाची मिग, फ्रान्सच्या राफेल आणि स्वीडनच्या साब कंपनीमध्ये स्पर्धा आहे. साबला हे कंत्राट हवे आहे. त्यासाठी साब ग्रिपेनच्या सिस्टिमसह संपूर्ण पॅकेज द्यायला तयार आहे. फक्त आम्ही टेक्नोलॉजी ट्रान्सफर करणार नाही. त्याऐवजी फायटर विमानांसाठी लागणारे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात भारताला मदत करु असे ओला रिगनेल यांनी सांगितले. ते साबचे भारतातील चेअरमन आहेत. लखनऊमध्ये सुरु असलेल्या डिफेन्स एक्सपोमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button