breaking-newsआंतरराष्टीय

बगदादीची बहीण तुर्की सैनिकांच्या ताब्यात

अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झालेला आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याच्या बहिणीला सीरियाच्या उत्तर भागातून तुर्कस्तानच्या सैनिकांनी ताब्यात घेतल्याचे मंगळवारी एका अधिकाऱ्याने सांगितले.

अझाझ शहराजवळ तुर्कीच्या सैनिकांनी छापा टाकून बगदादी याच्या बहिणीला ताब्यात घेतल्याची माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. बगदादीच्या बहिणीचे नाव रासमिया अवाद असे असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. रासमिया हिच्यासमवेत तिचा पती, सून आणि पाच मुले होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी तिघांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. रासमिया हिला आयसिसबद्दल कितपत माहिती आहे याची चाचपणी केली जात आहे. तिच्याकडून ठोस माहिती मिळाल्यास  या संघटनेच्या दहशतवाद्यांना पकडण्यास मदत होऊ शकते, असेही हा अधिकारी म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button