breaking-newsमनोरंजन

आयुषमान खुराना ‘ड्रीम गर्ल’च्या रुपात

चौकटीबाहेरचे विषय निवडत विभिन्न भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आयुषमान खुराना एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. ‘ड्रीम गर्ल’ या आगामी चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुषमानच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या पोस्टरमध्ये बाइक बसलेला आयुषमान बांगल्या आणि साडीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या या हटके लूकसोबतच चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा पेचात पाडत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हादेखील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button