breaking-newsमनोरंजन

‘आला रे आला सिम्बा आला’

दिग्दर्शक रोहित शेट्टी कायमच अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या चित्रपटांची निर्मित करत असतात. त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजतातही. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कलाकारांनी घेतलेली मेहनत ही पैसा वसूल करणारी असल्याचं पाहायला मिळतं. त्यांचा असाच एक पैसा वसूल करणारा ‘सिम्बा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली सारा अली खानदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम २’ मध्ये पोलिसांच्या रुपात झळकलेला अजय या चित्रपटातही पोलिसांच्याच भूमिकेमध्ये दिसून येत आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन आणि कॉमेडी दृश्यांवर भर देण्यात आला आहे. तर अतरंगी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीरही त्याच्या संवादाने आणि अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांचं पूरेपुर मनोरंजन करणार आहे. यामध्ये रणवीरने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button