breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात बायसीकल बसची निर्मिती, सायकल-मोटारसायकल- कारची घातली सांगड

पुणे –  पुण्यात बायसीकल बसचा प्रयोग करण्यात आला आहे. या बायसीकल बसला सायकल, मोटारसायकल आणि कारची सांगड घालत तयार करण्यात आले  असून मिलींद कुलकर्णी यांनी या बायसीकल बसची निर्मिती केली आहे.

ही बायसीकल बस लांबून एखाद्या कार सारखीच दिसते. याच्या आत सायकल सारखी रचना करण्यात आली आहे. यात बसायला सीट आहे, पायडल आहे. सायकल सारख पायडल मारल्यावर ही बायसीकल बस धावू लागते. बायसीकल बसची रचना अत्यंत सहजसोपी आहे. काही जुने पार्ट आणि काही नव्या सुट्ट्या भागापासून बायसीकल बस तयार केली जाते. कोथरुडसह वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये या बसचं काम झालंय. साधारण दीड लाख खर्च या बायसीकल बससाठी येतो. याला तयार व्हायला एका महिन्याचा कालावधी लागतो.

विकसीत देशात मोठ्या प्रमाणावर बायसीकल बसचा वापर होतो. मात्र भारतात बायसीकल बसचा वापर होत नाही. या बायसीकल बसमधून पाच ते सहा जण सहज प्रवास करु शकतात. तसेच गरजेनुसार कमी अधिक संख्येची बायसीकल बसही बनवता येते. बायसीकल बसमुळे प्रदुषण होत नाही. शारीरिक हालचाल होते. बायसीकल बसचा प्रवास सायकलपेक्षा सुरक्षित असल्याचा दावाही निर्मात्यांनी केला आहे. सध्या ही बायसीकल बस प्रायोगिक तत्त्वावर बनवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button