breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास

मुंबई | आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारीही करत होता. आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली, मात्र आपलं सिलेक्शन न झाल्याने तो काहीसा नाराज असल्याचे म्हटले जाते. त्याने दहा ऑगस्टला रात्री 10.30 वाजता राजस्थानमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राला कॉल केला. सिलेक्शन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button