breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बस फाडून मधोमध घुसले टँकर ; अपघातात 10 जण जागीच ठार

नवापूर | महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सोनगड शहराजवळ पोखरण गावात गुजरात परिवहन विभागाची बस, क्रुझर आणि टँकर अशा तिहेरी अपघात झाला. राँग साईडने भरधाव येणारे टँकर बसफाडून मधोमध घुसले.

त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर देखील बसच्या पाठीमागून भिडले. या भीषण अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू तर 24 प्रवाशी जखमी झाले आहेत. सदरील घटना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगड नजीक टँकर राँग साईडने आल्याने कुशलगठ-सुरत-उकई बसची धडक झाली या दरम्यान मागून भरधावा वेगाने येणारी प्रवाशी क्रुझरने बसला मागून जोरदार धडक दिली.

यात टँकर बसला अर्ध्यापर्यंत कापत मध्ये घुसला. या अपघातात 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातामुळे नागपूर -सुरत महामार्गावरील घटनास्थळ रक्तरंजित झाल्याचे दिसून आले. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्रवाशांना बसमधून बाहेर काढून व्यारा सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button