breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

आम्ही रात्रीच्या अंधारात नाही, तर दिवसाढवळ्या काम करतो; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

कोरोनामुळे लांबलेल्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने करण्यात आली. या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या अनेक टोले लगावल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात. जी कामे करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही’, असा टोला यावेळी फडणवीसांना ठाकरे यांनी लगावला

भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईतील जनतेसाठी आपण अनेक गोष्टी आणणार आहे. जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे, त्यामुळे पर्यावरणाचा-हास होता कामा नये. कामे करताना अहंकार असता कामा नये. शॉर्टकट मारल्यास रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. रात्री चालणारी कामे आम्ही दिवसा करू लागलो. जे करतो ते दिवसाढळ्या करतो,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button