ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

औद्योगिक नगरीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड |  पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा ढोरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, नगरसेवक विलास मडीगेरी, बाबू नायर, भाऊसाहेब भोईर, शैलेश मोरे, नगरसदस्या मीनल यादव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपआयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांसह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. ध्वजारोहण समारंभानंतर पालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या माहिती कक्षाचे उदघाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

चिंचवडगावातील क्रांतीतीर्थ चापेकर वाड्यात देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन, भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाजपचे संघटन सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संस्थेचे उपाध्यक्षा शकुंतला बंसल , सहकार्यवाह रवींद्र नामदे , कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी , वाडाविभाग प्रमुख मधुसूदन जाधव , शाळा समिती अध्यक्ष अशोक पारखी, नितीन बारणे, वाडा विभाग प्रमुख असाराम कसबे ,वाडा विभाग प्रमुख शरद जाधव , अविनाश अगज्ञान , अतुल आडे व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि चिंचवड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अमोल थोरात म्हणाले, “चिंचवड क्रांतीकारांची भूमी आहे. चापेकरवाडा प्रेरणास्थळ आहे. येथे आल्यानंतर देशभक्तीची प्रेरणा मिळते. चापेकर वाड्यातील ध्वजारोहण करताना अंगावर शहारे आले होते. चापेकरवाड्याच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. यासाठी सहकार्य केले जाईल”.

दुर्गा ब्रिगेड संघटना, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या संयुक्त वतीने स्वातंत्र्य दिनाचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत मातेच्या प्रतिमेचे प्रदेशाध्यक्ष अभय दादा भोर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे महावितरणचे वरिष्ठ मुख्य अभियंता गवारे साहेब उपस्थित होते. भोसरी एमआयडीसी येथे दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मानवंदना व परेड करण्यात आली. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश नवले यांनी आपले विचार मांडले. गुरुनाथ शेट्टी, सुवर्णा शिंदे, उमेश चव्हाण, अविष्कार सर्वोदय, ओमकार पवार, निकिता पांढरे, गौरी सपकाळ, आरती कानडे , आकाश बनसोडे ,राज शेख,सतीश शर्मा, कुंभार आणि अनेक कार्यकर्ते व कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथे स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा झाला. उद्योजिका सुनीता पाटसकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महिलांनी उद्योजिका व्हावे असा संदेश देत पाटसकर यांनी उपस्थित महिलां मधे उत्साह निर्माण केला. प्रमुख वक्ते विलास लांडगे यांनी मार्गदर्शनात नव निर्माण राष्ट्र घडवणे म्हणजे तरुण युवा पिढीला घडवणे ,तयार करणे महिलांना सक्षम बनविणे, प्रोत्साहन देणे होय . अनेक उदाहरणे देऊन त्यांनी समाजला पर्यायाने राष्ट्रला कसे सक्षम ते कडे घेऊन जायचे हे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात प्रथमच ध्वजारोहणाचा मान महिलेला देण्यात आला आहे.
आजच्या स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण जबाबदारी महिला विभाग कार्यकारणीने यशस्वीरीत्या पार पाडली.

चिंचवड, विद्यानगर येथे माजी नगरसेवक राम पात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खाऊ वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे, कन्नड समाज शहराध्यक्ष परशुराम बसरकोड, शाखाप्रमुख गंगाधर काळे, सुभाष कांबळे, विश्वनाथ पात्रे, निलेश भिगवणकर, प्रीतम तेलंग, अंकुश पात्रे, वामन कांबळे, नारायण सजगणे, परशुराम जगदाळे, अंगणवाडी मदतनीस पानसकर बाई विद्या माने, फुलाबाई पात्रे, रुक्मिणी मोरे उपस्थित होते.

काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, कै.श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालय व श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कुल यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

शिवाजी तेलंगे व राजाराम शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी तिन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत वाखारे , नवनाथ गारगोटे , रेणू वर्मा यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी यमुनानगर निगडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दुर्गा ब्रिगेड संघटना, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या संयुक्त वतीने स्वातंत्र्य दिनाचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

प्राधिकरण काचघर चौक येथील गरवी गुजराथी समाज व मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सामुदायिकरित्या स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गरवी गुजराथी समाजाचा ध्वजारोहण विजय शिनकर यांच्या हस्ते तर मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबचा ध्वजारोहण आंतरराष्ट्रीय प्ले असोसिएशनचे सदस्य डॉ. संजय आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर आर एस कुमार, गरवी गुजराथी समाजचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, साधना पाटील, अमृता वैद्य, खलील शेख, अण्णा अभंग, जिगर व्यास, हार्दिक जानी, कीर्ती शहा, नयन तन्ना, अल्पेश हिरानी, यतीन संपत, जयेश वाडोदरिया, अमित मिस्त्री, योगेश परमार, अशोक तनपुरे, प्रवीण अगरवाल, प्रतिक गरड आदी उपस्थित होते. तर, मौल्लाना आझाद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष खलील शेख, फरहान शेख, असाद शेख, विजय शिनकर, राजेंद्र बाबर, नरेंद्र येळकर, सुहास करडे, ऋषिकेश टेकाडे, नितेश पवार आदी उपस्थित होते.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने 75 व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक अनुप ठाकूर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. लायन्स क्लबचे विनोद झुनझुनवाला, मोहन अगरवाल, कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या पोर्णिमा कदम, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस उपस्थित होते.

उपस्थितांच्या वतीने महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता मिळविलेल्या उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. सारीका जाधव, प्रा. संजीवनी पांडे, प्रा. गुरूराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर, डॉ. श्वेता जैन, डॉ. महिमा सिंग, डॉ. रेखा चव्हाण, डॉ. सुवर्णा गायकवाड यांच्यासमवेत कोरोना प्रादुर्भाव काळात अवघ्या जगाला विळखा घातल्यानंतर देवदूतासारखी सामाजिक जाणिवेतून मदत करणार्‍यांना कोरोना योद्धा पुरस्कार स्मृतीचिन्ह स्वरुपात डॉ. हर्षिता वाच्छानी, डॉ. रूपा शहा, गुलामअली भालदार, संदीप शहा, परमेश्वर बनसोडे यांना देण्यात आला. त्याचबरोबर दहावी, बारावी परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button