breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही’, तरी ते ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे फिरत आहेत’

मुंबई : आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत मागे धावणं हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा भाजप आमच्या पाठीमागे धावत असून युतीसाठी आम्हाला मिठी मारू पाहत आहे. मुळात, आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तरी, भाजप आमच्या मागे रोडरोमियोसारखे फिरत आहे. आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

2017  मध्येच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. महाराष्ट्रात युती होणार नाही, असं त्यांनी त्यावेळी ठामपणे सांगितलंय. मग असं असतानाही, भाजप आमच्यामागे रोडरोमियो प्रमाणे फिरत आहे. आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत मागे धावणं हा कायद्याने गुन्हा आहे. आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आम्ही लढवय्ये आहोत. त्यामुळे ज्यांना ‘पटकायचंय’ त्यांना स्वबळावरच ‘पटकून’ दाखवू, असा निर्धार पक्षाने केला आहे, असे राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button