breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘भाऊ-वहिनींच्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर धूम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाऊ आणि वहिनी यांच्यावर प्रत्यक्षात शुभेच्छांचा वर्षाव होत असला तरी दोघांच्या अनोख्या फोटोंनी सोशल मीडियावर धूम ठोकलीय. यातून भाऊ आणि आश्विनीवहिनी यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम समाज माध्यमातून स्पष्ट दिसत आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण भाऊंच्या चाहत्यांची संख्या समाजामध्ये मोठी आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने या चाहत्यांनी सोशल मीडियातून भाऊ आणि आश्विनी वहिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. आज दिवसभर दोघांच्या फोटोंनी फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्रामवर धूम ठोकली आहे. त्यातील काही फोटोंनी त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विविध फोटो अपलोड होत असले तरी बुलेट दुचाकीवरील भाऊ-वहिनींचा तो फोटो वारंवार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे तरुणांना दोघांच्या त्या फोटोने भुरळ घातल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button