breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

छठ पूजा स्पेशल ट्रेन 2022: रेल्वे मुंबई / पुणे आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

पुणे : खाली दिलेल्या तपशिलानुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान 4 आरक्षित आणि 6 अनारक्षित फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवणार आहे.

मुंबई-दानापूर अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल (4 सेवा)

01411 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 26.10.2022 आणि 29.10.2022 रोजी 11.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.00 वाजता दानापूरला पोहोचेल.

01412 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 27.10.2022 आणि 30.10.2022 रोजी 19.55 वाजता दानापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 23.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

रचना: दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 18 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

पुणे-दानापूर अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल (2 सेवा)

01415 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून 28.10.2022 रोजी सकाळी 00.10 वाजता निघेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल.

01416 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 29.10.2022 रोजी 11.00 वाजता दानापूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड दोरमार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

रचना: दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

पुणे-दानापूर फेस्टिव्हल स्पेशल (4 सेवा)

01417 सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून 29.10.2022 आणि 1.11.2022 रोजी सकाळी 00.10 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पोहोचेल.

01418 सुपरफास्ट स्पेशल 30.10.2022 आणि 2.11.2022 रोजी दानापूर येथून 11.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.30 वाजता पुण्याला पोहोचेल.

थांबे: दौंड दोरमार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

रचना: तीन AC-2 टियर, 6 AC-3 टियर, 5 स्लीपर क्लास, 5 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे यामध्ये एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

आरक्षण: 01417 सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशलसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 26.10.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button