breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताची आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ सज्ज

मुंबई : चिनी नौदलाची वाढती ताकद पाहून भारतही सज्ज झाला आहे. भविष्यातला धोका ओळखून अनेक विध्वंसक शस्रं नौदलात दाखल केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात सर्वशक्तिमान शस्र दाखल होतं आहे.

INS अरिघात ही भारताकडची दुसरी आण्विक पाणबुडी असेल. जी पुढच्या 2 ते 3 महिन्यात समुद्रात दाखल होईल. मागच्या 3 वर्षांपासून अरिघातची चाचणी सुरु होती. ती चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या वर्षातच भारताची INS ”अरिघात” शत्रूवर आघात करण्यासाठी सज्ज असेल. अरिघात पाणबुडी सज्ज होताच चीन आणि खासकरुन पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढणार आहेत.

INS ‘अरिघात’ची निर्मिती अत्यंत गुप्तपणे केली गेली. 2017 मध्ये या पाणबुडीचं लाँचिंग सुद्धा गुप्त ठेवलं गेलं होतं. लाँचिंगआधी पाणबुडीचं नाव INS अरिदमन होतं. लाँचिंगवेळी त्यात बदल करुन INS अरिघात केलं गेलं.

अरिघात पाणबुडीबाबत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार डिसेंबरमध्ये अरिघात पाणबुडी नौदलाला सुपूर्त केली जाईल. ही पाणबुडी अरिहंत क्लासमधलीच दुसरी पाणबुडी असली, तरी INS अरिहंतहून कैक पट घातक आहे. विशाखापट्टनमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये अरिघातची निर्मिती केली गेली. बनावट आणि माऱ्याच्या अनोख्या तत्रंज्ञानामुळे अरिघात पाणबुडी भारतीय नौदलाकडचं ब्रह्मास्र ठरेल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button