breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

आमदार जगतापांच्या मागणीला यश, संजय गांधी योजनेसाठी पिंपरीत स्वतंत्र कक्ष

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुण्यातील कार्यालयात जाण्याची गरज नाही. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे याची मागणी केली होती.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पिंपरी-चिंचवडमध्ये असंख्य लाभार्थी आहेत. अनेकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. मात्र, नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता पुण्यातील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. नागरिकांची होणारी तारांबळ टळावी, त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये या योजनेच्या लाभासाठी पाठपुरावा करणे सोपे व्हावे, यासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयात या योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

तहसिल कार्यालयातील लिपिक भीमाशंकर बनसोडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अर्ज स्वीकारून त्याची प्राथमिक छाननी करणे, कागदपत्रांची पुर्तता करून घेणे, पात्र अर्ज हवेली तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेकडे अंतिम पुर्ततेसाठी पाठवून पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी बनसोडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button