breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून सांगलीत एकाची आत्महत्या

सांगली: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील माधवनगर कॉटन मिल परिसरात शनिवारी घडलेली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केलेली आहे. शहाजहान खान असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहाजहान हे मिल चाळीत एकटेच राहत असून शनिवारी बराच उशीर झाला तरी ते खोलीतून बाहेर पडलेले नाहीत. यामुळे त्यांना पाहण्यासाठी आलेल्या शहाजहानच्या भावाने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले होते. त्यानंतर शहाजहान यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. शहाजहान हे 40 वर्षीय असून त्यांचे चायनीज पदार्थांचे स्टॉलदेखील आहे.

घरात एकटेच राहत असलेले शहाजहान बराच वेळ झाला तरी बाहेर न आल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांचा भाऊ आला होता. परंतु बाहेरून आवाज देऊन आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने शहाजहान यांच्या भावाने दरवाजा उघडून पाहिले. त्यावेळी शहाजहान हे रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडल्याचे दिसले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी इलेक्ट्रिक कटर मशीन दिसलेली आहे. त्यामुळे मृतांनी कटर मशीच्या सहाय्याने आपला गळा चिरला आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button