breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्या विरोधात भारतासह 16 देशांच्या व्यापारी आघाडीची शक्‍यता…

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ट्रम्प यांच्या विरोधात भारतासह 16 देशांच्या व्यापारी आघाडीची शक्‍यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक संरक्षणवादाच्या विरोधात भारत आणि जपानसह 16 देशांची या वर्षाच्या अखेरीस आघाडी बनवण्याची तयारी चालू आहे.

जपानमधील टोकियो शहरात आरईसीपी (रिजनल इकॉनॉमिक कॉंप्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप) संबंधी एक बैठक झाली. या बैठकीत आशियातील देशांच्या व्यापार मंत्र्यांनी रविवारी एक पाऊल पुढे टाकले आहे. या सर्व देशांमध्ये येत्या काही महिन्यात परस्पर मतभेद दूर करून मुक्त व्यापारासंबंधी समझोत्यासाठी सहमती होण्याची शक्‍यता आहे.

जर ही आघाडी प्रत्यक्षात आली, तर जगातील एक तृतियांश अर्थव्यवस्था आणि निम्मी लोकसंख्या याता सामावली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी अमेरिकन संरक्षणवादाला तोड देण्यासाठी क्षेत्रीय व्यापार समझोत्याला लवकराता लवकर अंतिम स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे. समझोत्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जपानचे व्यापार मंत्री हिरोशिसेको यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button