breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आमदार कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांचा कारावास

लखनऊ : उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भाजपने पक्षातून निलंबित केलेला उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीप सिंह सेनगर याला आज ही कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या केल्याच्या आरोपात कुलदीपसिंह सेनगर दोषी ठरला होता. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले होते. यावेळी न्यायालयाने त्याला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवले होते.

सेनगर याला २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने दोषी ठरवले होते. न्यायालयाने याप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालीन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालीन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह तर्था बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह तथा सुमन सिंह, जयदीप सिंह तथा अतुल सिंह यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button