breaking-newsराष्ट्रिय

रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

नवी दिल्ली : चीनसोबत सीमेवर तणाव वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोघांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच लेह-लडाख दौऱ्यावरून परतले आहेत. सीमा भागातूनच नरेंद्र मोदी यांनी चीनला ठणकावले होते. राजधानी दिल्लीला परतल्यावर पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button