breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली तुमच्या पक्षातील नेत्यांवर बलात्काराचे, विनयभंगाचे आरोप आहेत त्याचं काय

“मी तुरुंगात जायलाही तयार आहे”; उर्फी जावेद 
राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का?
पुणे : सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद ही तिच्या भन्नाट कपड्यांच्या निवडीवरून नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ हा वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून सार्वजनीक ठिकाणी अगंप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदवर पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. यावर उर्फीने चित्रा वाघ यांनाच सवाल केले आहेत.
मला या कायद्याच्या कचाट्यात पडायचं नाहीये. मी तुरुंगात जायलाही तयार आहे. फक्त तुम्ही तुमची संपत्ती जाहीर करून टाका. तुम्ही राजकराणी किती आणि कसं कमवता ते एकदा जगाला कळू द्या. तुमच्या पक्षात अनेक नेत्यांवर बलात्काराचे , विनयभंगाचे आरोप केले गेलेत, त्यासाठी तुम्ही काही केल्याचं दिसलं नाही, असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.
माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, असा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना लगवला आहे.
उर्फीने शिवीगाळ करत केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button