breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीव्यापार

आमच्याकडे 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड, पण, गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक कंपनी दिसत नाही : वॉरेन बफे

ओमाहा | अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेकडे सध्या खूप रोकड आहे, मात्र सध्या गुंतवणूक करावी अशी आकर्षक कंपनी दिसत नसल्याचे म्हटले आहे. ८९ वर्षीय अब्जाधीश बफे यांनी सांगितले की, सध्या गुंतवणुकीयोग्य काहीच नाही. त्यांनी हेही सांगितले की, स्थिती खूप लवकर बदलू शकते किंवा बदलूही शकत नाही. मार्च तिमाही अखेरीस बर्कशायरकडे १३,७०० कोटी(सुमारे १० लाख कोटी रु.) डॉलर रोकड होती.

बर्कशायरचे समभागधारक वाट पाहताहेत की, बफे काही रक्कम कुठेतरी गुंतवतील. कोरोना विषाणूमुळे अनेक समभागांत मोठी घसरण आली आहे. एसअँडपी ५०० फेब्रुवारीच्या विक्रमी पातळीवरून ३५% आले आहेत. याआधी जेव्हा समभागांत अशा पद्धतीची घसरण आली तेव्हा बफे यांनी अशा संधीचा फायदा उचलला होता आणि कंपन्यांत अंशत: मालकी हक्क खरेदी केला. २००८ च्या वित्तीय संकटादरम्यान त्यांनी बँक ऑफ अमेरिका आणि गोल्डमन सॉक्ससारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक केली. बफे म्हणाले, आम्ही लोक खूप करू इच्छितो. आम्हाला ३, ४ वा ५ हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करावी,असे वाटते. मात्र, सध्याच्या स्थितीत गुंतवणूक करावी,अशी आकर्षक कंपनी नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button