breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
समाजसेवा करा; गुजरात दंगलीतील आरोपींना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
२००२ मध्ये उसळलेल्या गुजरात दंगलीतील सदरपुरा येथील १७ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोषींना जामीन मंजूर केला असून, त्यांना जामीन मिळालेल्या कालावधीत सामाजिक कामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.
१७ दोषींच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षेतेखाली खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मध्य प्रदेशातील इंदूर आणि जबलपूरमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जामीनाच्या काळात आरोपींच्या दैनंदिनीवर नजर ठेवण्यास सांगितलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला त्यांच्या उपजीविकेसाठी काम शोधण्यासाठी सांगितले आहे. तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणास त्यांच्या वर्तणुकीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.