breaking-newsराष्ट्रिय

आप आमदाराच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा; अडीच कोटींची रोकड जप्त

प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी रात्री उशीरा आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर छापेमारी केली. या छाप्यात अधिकाऱ्यांना २.५६ कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ANI

@ANI

Delhi: Income Tax Department seized Rs 2.56 crore cash during raids at the premises of AAP MLA from Uttam Nagar, Naresh Balyan, today.

५,५५४ लोक याविषयी बोलत आहेत

सुत्रांच्या माहितीनुसार, बाल्यान हे दिल्लीच्या उत्तम नगर मतदारसंघातून आमदार झाले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अध्यक्षांनी ज्या जागेवर छापेमारी केली होती. तिथे बाल्यान दोन कोटी रुपये घेऊन आले होते. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

छापेमारी करण्यात आलेले ठिकाण हे प्रदीप सोलंकी नामक प्रॉपर्टी डीलरचे कार्यालय असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलंकी यांचे निधन झालेले आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाल्यान यांच्यासोबत त्यांच्या एका नातेवाईक तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Delhi: Income-Tax raids continue at the premises of AAP MLA from Uttam Nagar, Naresh Balyan. Rs 2.56 crore in cash seized in the raids

३३६ लोक याविषयी बोलत आहेत

प्राप्तिकर विभागातील आठ अधिकारी आमदार बाल्यान आणि सोलंकी यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button