breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत विक्रमी प्री-पोल मतदान

वॉशिंग्टन – कोरोना महामारीने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी होणाऱया मतदानाचा कलच बदलला आहे. लाखो मतदार गर्दीयुक्त मतदान केंद्रांवर जाणे टाळू पाहत आहेत. परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांच्यातील लढतीसाठी ते उत्सुक देखील आहेत. याच कारणामुळे प्री पोल मतदानाने यंदा विक्रम प्रस्थापित केला आहे.

2020 मध्ये प्री इलेक्शन बॅलेट्सची संख्या 4 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या मार्गाने पडलेल्या मतांच्या पुढे गेली आहे. 9 नोव्हेंबर रोजी होणाऱया अंतिम निवडणुकीच्या 9 दिवसांपूर्वीचा हा आकडा आहे. रविवारपर्यंत 5.9 कोटीहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. युएस इलेक्शन असिस्टेन्स कमिशनच्या संकेतस्थळानुसार मागील वेळी एकूण 5.7 कोटी लोकांनी मेलद्वारे किंवा मतदानापूर्वी मत दिले होते. यंदा हे प्रमाण याहून अधिक असणार हे निश्चित.

डेमोक्रेट्सना लाभाची शक्यता

डेमोक्रेटिक पार्टी प्रारंभापासूनच निवडणूकपूर्व मतदानाला प्रोत्साहन देत आहे. अशा प्रकारच्या मतदानामुळे डेमोक्रेटिक पार्टीला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. याच्या उलट डोनाल्ड ट्रम्प मागील अनेक महिन्यांपासून मेलद्वारे टाकण्यात आलेले मत (मेल इन बॅलेट) फसवणुकीचे कारण ठरू शकते, असा दावा करत आहेत. याच कारणामुळे रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांकडून निवडणुकीच्या दिवशीच मतदान होण्याची अपेक्षा आहे.

रिपब्लिकन पार्टीचा गड

टेक्सासमध्ये शुक्रवारपर्यंत प्री-पोल मतदान सुरू आहे. अंतिम दिनापर्यंत टेक्सासमध्ये 2016 पेक्षा अधिक मतदान होण्याची दाट शक्यता आहे. टेक्सास प्रांत पारंपरिक दृष्टय़ा रिपब्लिकन पार्टीचा गड राहिला आहे. 1980 पासूनच तेथे रिपब्लिकन उमेदवारांना समर्थन मिळाले आहे. परंतु अलिकडच्या काही सर्वेक्षणांमध्ये बिडेन हे ट्रम्प यांच्यावर आघाडी घेत असल्याचे दिसून आले आहे.

15 कोटी लोकांकडून मतदान शक्य

यंदाच्या निवडणुकीत 15 कोटीहून अधिक जण मतदान करू शकतात असा अनुमान आहे. 2016 च्या निवडणुकीत हा आकडा 13.7 कोटी राहिला होता. यात काही प्रांत अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. तेथील मतदानाचा आकडा विक्रमी राहू लागला आहे. यात टेक्सासही सामील आहे. 2016 च्या तुलनेत तेथे आतापर्यंत 80 टक्के मतदान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button