breaking-newsआंतरराष्टीय

नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त वावर; दि टेलिग्राफच्या पत्रकाराकडून भेटीचा व्हिडिओ समोर

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून या ठिकाणी त्याचा मुक्तपणे वावर असल्याचे समोर आले आहे. ‘दि टेलिग्राफ’ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबत दावा केला आहे. नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे.

एम्बेड केलेला व्हिडिओ

The Telegraph

@Telegraph

Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India’s historyhttps://www.telegraph.co.uk/news/2019/03/08/exclusive-indias-wanted-man-nirav-modi-accused-15bn-fraud/ 

१२.९ ह लोक याविषयी बोलत आहेत

भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा (१३ हजार कोटी) सुत्रधार असलेला नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी हरऐक प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नातूनच इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.

विशेष म्हणजे दि टेलिग्राफच्या प्रतिनिधीने नीरव मोदीला शोधून काढल्याचा दावा केला असून तो वेस्ट एन्ड लंडनमधील सेंटर पॉईंट टॉवरमध्ये एका तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे टेलिग्राफच्या प्रतिनिधीला नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसून आला असून त्याने मोदीशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. या भेटीचा व्हिडिओही या पत्रकाराने चित्रीत केला आहे. या व्हिडिओतून नीरव मोदीचा नवा लूक समोर आला आहे. यामध्ये त्याने दाढी आणि मिशा ठेवल्याचे दिसत आहे.

दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी एक असलेला अलिबाग किहीम येथील बंगलाही प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. समुद्र किनारी असलेला हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने हा बंगला अंशतः जमीनदोस्त करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button