breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवेंद्रराजेंच्या फेसबुक पेजवरील पवारांचा उल्लेख ‘जाणता राजा’ उल्लेख बदलला

पुणे|महाईन्यूज|

शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना साताऱ्याचे छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर पवारांचा उल्लेख जाणता राजा असा केला होता. तो आता एडिट करून लोकनेते असा करण्यात आला आहे. सध्या हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवेंद्रराजे यांचे हे अधिकृत फेसबुक अकाऊंट नसल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यानंतर मोठा वाद झाला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जाणता राजा म्हणून होत असलेल्या उल्लेखावरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर काही शिवेंद्रराजेंनी पवारांचा जाणता राजा असा केलेला उल्लेख एडिट केला आहे. आज (ता.१४) छत्रपती उदयनराजे यांनीही पत्रकार परिषद घेऊन जाणता राजा हे एकमेव शिवाजी महाराज होते असे म्हणत पवारांवर निषाणा साधला होता.

शिवेंद्रराजे यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी जाणता राजा आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशा आशयाची पोस्ट केली होती. ती आज लोकनेते आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशी एडिट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button