breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांना महापालिकेतर्फे अभिवादन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर सचिन चिंचवडे व अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माजी भुलतज्ञ डॉ. सुभाष मदने, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले की, राजे उमाजी नाईक हे भारताला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक होते. पहिल्या उठावाव्दारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळोकी पळो करुन सोडणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतीकारक नरविर ठरला गेला, तो म्हणजे राजे उमाजी नाईक होय.