breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगलने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मॅप्समध्ये दिलं आणखी एक खास फीचर

गुगलने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मॅप्समध्ये आणखी एक खास फीचर दिलं आहे. या नवीन फीचरमुळे प्रवास करताना कोरोना व्हायरसपासून बचावास मदत मिळेल. गुगलच्या या नवीन फीचरद्वारे युजर पाहू शकतील की एखाद्या विशेष वेळात रेल्वे स्टेशनवर किती गर्दी आहे. याशिवाय निश्चित मार्गावर बस नियमित सुरू आहे का नाही, याची देखील माहिती मिळेल.

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, या ट्रांसिट अलर्ट फीचरला अर्जेंटिना, फ्रान्स, नेदरलँड, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुरू केले असून, लवकरच इतर देशांमध्ये देखील हे फीचर रोल आउट केले जाणार आहे. गुगल मॅपच्या या नवीन फीचरद्वारे युजर्सला निर्बंध असलेल्या भागाची माहिती देखील मिळेल. ज्या शहरात कोरोनाचा अधिक प्रभाव असल्यास गुगल मॅपच्या साहाय्याने या भागांची माहिती मिळेल. याशिवाय गुगल मॅप्सच्या होम स्क्रीनवर अलर्ट पर्याय निवडल्यावर त्या भागातील संबंधीत कामाच्या लिंक देखील मिळतील.

दरम्यान, कंपनीने काही दिवसांपुर्वीच लॉकडाऊनमध्ये हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यास मदत करण्यासाठी 131 देशांमध्ये गुगल युजर्सच्या फोनद्वारे जागेचा डेटा विश्लेषण केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button