breaking-newsताज्या घडामोडीपुणे

युवा सेना नेत्याच्या हत्येप्रकरणी गँगस्टर बापू नायरला अटक

पुणे |महाईन्यूज|

युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणात कुविख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर (रा. इंदिरानगर) याला फरासखाना पोलिसांनी येरवडा कारागृहातून अटक केली. त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात या आधी दहा जणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यात गुंड बापू नायर याचा सहभाग असल्याचे समोर आले. बापू नायरला ससून रुग्णालयात मारटकर यांचा खून करणारे आरोपी भेटण्यास गेल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रथम बापू नायर टोळीचा सदस्य स्वप्नील मोढवे याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली होती.

बापू नायरवर कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असणाऱ्या एका गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई केली होती. या गुन्ह्यासाठी तो सध्या येरवडा कारागृहात होता. मात्र, दीपक मारटकर खुनाच्या घटनेपूर्वी तो दोन ते तीन दिवस आजारी असल्याने ससून रुग्णालयात आला होता. त्या वेळी मारटकर खुनातील आरोपींनी त्याची ससून हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

पोलिसांनी या गुन्ह्यात १२ जणांवर ‘मोक्का’नुसार कारवाई केली आहे. त्यात बापू नायरला अटक करण्यात आली आहे. दीपक मारटकर खूनप्रकरणी बापू नायरचा सहभाग निष्पन्न झाला. बापू नायरला ससून रुग्णालयात आल्यानंतर त्या वेळी ड्युटीवर शिवाजीनगर मुख्यालयात कोर्ट कंपनीत असणारे कर्मचारी होते. ते असताना नायरला आरोपी भेटले कसे, असा ठपका ठेवून सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यानंतर नायरलादेखील अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button