breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘करोना’च्या खरेदीवर पदाधिकार्‍यांचा ‘डोळा’ चौकशी, विचारणा अन् टक्केवारीची गणिते

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाची दशहत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर करोना बाधितांसह संशयितांना विविध सुविधा पुरविण्यासाठी भांडार विभागातून सुरू असलेल्या ‘खरेदी’वर महापालिकेतील सत्ताधार्‍यांचा ‘डोळा’ असल्याचे समोर आले आहे. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या खरेदीत पदाधिकार्‍यांकडून ढवळा ढवळ सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यातच 12 रुग्ण करोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पालिकेने जोरदार हालचाली करत शहरातील रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या तबलगी समाजातील दोघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील काही जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तर दहाजण अद्यापही गायब आहेत.दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि शासनाचे आदेश डोळ्यासमोर ठेवून महापालिकेकडून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, क्वारंटाईन केलेल्या लोकांसाठी गरजेच्या वस्तू तसेच मास्क व सॅनिटाईझरची खरेदी सुरू आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेवून सुरू असलेली खरेदी ही आयुक्तांच्या अधिकारात सुरू आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पक्षनेते, स्थायी समिती सभापतींसह महापौर व उपमहापौर या खरेदीबाबत माहिती जाणून घेत असल्याचे आज समोर आले. मागणी, पुरवठा आणि ठेकेदारांची माहिती घेतली जात असल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे? हे कोणाच्याच लक्षात येत नसल्यामुळे काही अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये गोेंधळाची स्थिती आज पहावयास मिळाली. या प्रकारामुळे करोनाच्या गंभीर परिस्थितीत पदाधिकार्‍यांची ढवळा ढवळ सुरू होण्याची शक्यता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button