breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य – विजया रहाटकर

  • महापालिकेच्या प्रज्वल योजना शिबिराचे झाले उद्घाटन
  • शेवटच्या घटकापर्यंत कायदे पोहोचविण्याचे रहाटकर यांचे आवाहन

पिंपरी, (महाईन्यूज) – महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदे तयार केले असून त्या कायदयाअंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असून संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असे प्रतिपादन महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आज आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर येथे महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ई प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील नगरसदस्या, स्विनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.

रहाटकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग हे महिलांचे जीवनमान उंचवण्याचे काम करीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे तयार केले आहेत ते शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे आहेत. महिलांचे बचत गट ही खूप चांगली चळवळ आहे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बतच गटाच्या योजनांची माहिती दिली जाते. केंद्रसरकार व राज्य सरकारच्या महिलांविषयक धोरण व योजनांची त्यांनी माहिती दिली.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, सर्व क्षेत्रात महिला सक्षम झाल्या पाहिजेत आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून बचत गटांना विविध घरगुती व्यवसायासाठी अर्थसाहाय्य पुरविले जाते. यामुळे गरीब कुटूबांचे आर्थिक दुष्टया जीवनमान उंचावते.

महापौर राहूल जाधव म्हणाले, पवनाथडीच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालास योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून स्टॉल्सची उभारणी केली जाते व प्रोत्साहन दिले जाते.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महपालिकेच्या माध्यमातून बचतगटांच्या उन्न्तीसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरात १५ हजारापेंक्षा जास्त बचतगट स्थापन झाले आहेत. आपल्या कुटूबांला संपन्न बनविण्याची क्षमता महिलांमध्ये असते. महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

यावेळी शलाका साळवी व मिनल मोहाडीकर यांनी सरकारच्या महिलांविषयक योजना व कायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. कोकाटे यांनी केले. तर, आभार सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button