breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र, म्हणाले…

नवी दिल्ली: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदारांनी मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी यासाठी सर्व खासदारांना राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहिलेले आहे. संभाजीराजे आपल्या पत्रात म्हणाले की, ‘आपण सर्व जण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले होते. ते राज्यात लागू सुद्धा झाले होते. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून ते पुढील निर्णयाकरिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आलेले आहे.’

‘न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती मध्ये स्थगिती दिलेली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते आहे. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू आहे.’ असं संभाजीराजेंनी या पत्रात म्हटलेलं आहे. ‘केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण दिलेले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु, केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे.’ अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

तसंच, ‘आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33 टक्केच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू’ अशी विनंती संभाजीराजे यांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button