breaking-newsपुणे

आझम कॅम्पस तर्फे मालधक्का भागात गरजूंना किराणा सामानाची मदत

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

आझम कॅम्पस तर्फे मालधक्का ,मंगळवार पेठ  भागातील गरजूंना  किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते  ही मदत देण्यात आली.हा कार्यक्रम शुक्रवार १५  मे रोजी सायंकाळी आझम कॅम्पस  येथे झाला . ज्येष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांच्या विनंतीनुसार या भागात मदत देण्यात आली.

शाहीद शेख,समीर शेख,साबीर शेख उपस्थित होते.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातर्फे पुण्याच्या सर्व भागात गरजूंना मदत देण्याचा प्रयत्न सुरु आहे,हा उपक्रम संकटकाळी धीर देणारा आहे,आतापर्यंत कोथरूड,भवानी पेठ,लष्कर,कोंढवा,बिबवेवाडी आणि मुंढवा भागात मदत पोहोचविण्यात आल्याची माहिती डॉ.पी.ए.इनामदार यांनी दिली. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button