breaking-newsपुणे

भवानी पेठेच्या कंटेन्मेंट भागात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे तपासणी

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांच्या मदतीला आजपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे ‘डॉक्टर्स आपल्या दारी’ हे अभियान सुरु झाले. या अभियानाद्वारे पुणे शहराच्या कंटेनमेंट वैद्यकीय मदत शिबिरे आयोजित केली जात आहेत.

  आज (शुक्रवारी )दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पबचत भवन येथे अभियानाचा अनौपचारिक प्रारंभ केला. या अभियानात एकूण १५० डॉक्टर्स मंडळींनी सहभाग नोंदविल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी दिली.एक महिना हे अभियान चालणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी अभियान भवानी पेठ भागात लोहियानगर,फायर ब्रिगेड जवळ तसेच सावधान मंडळ(गंजपेठ,चंदन स्वीटमार्ट जवळ)येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत घेण्यात आले. २रुग्ण वाहिकांसह १५ डॉक्टर्स सहभागी झाले.७८५ जणांची तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आले.डॉ राजेश पवार , डॉ संगीता खेनट, डॉ नरेंद्र खेनट, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ तुषार वाघ, डॉ.सिद्धार्थ जाधव, डॉ. मोहन ओसवाल, डॉ नितीन पाटील, डॉ सचिन लोंढे, डॉ कपिल जगताप आदींनी सहभाग घेतला. 

चेतन तुपे, विनायक हनमघर, गणेश नलावडे, बाबा धुमाळ, सुहास ऊभे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button