breaking-newsपुणे
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन कडून पोलिसांना बाटलीबंद पाण्याची मदत
पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन कडून पुणे पोलिसांना १५ हजार पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.लॉक डाऊन काळात पोलिसांवर येणारा कामाचा ताण लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनने पोलिसांसमवेत परिमंडळ ३,परिमंडळ १ भागात मदत कार्य केले.त्या अंतर्गत पोलिसांना आणि निवारागृहात राहणाऱ्या स्थलांतरीताना बाटलीबंद पाणी पुरविण्यात आले.त्यासाठी रोटरी सदस्यांनी १ लाखाचा निधी उभा केला.रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे अध्यक्ष सुनील बर्वे,माजी अध्यक्ष शैलेश गांधी यांनी परिमंडळ एक च्या पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे,पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्याकडे ही मदत सुपूर्त केली.रोटरी पदाधिकारी सागर अत्रे यांनी संयोजन केले.