breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिळकतधारकांनी महापालिकेला लावला चूना; चालू वर्षी 3 कोटीचे चेक बाउंस!

चालू वर्षी डिसेंबरअखेर 572 मिळकतधारकांनी थकबाकीपोटी दिलेले धनादेश बाउंस

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांनी थकबाकीपोटी जमा केलेले धनादेश बाउंस होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2019 अखेर 572 मिळकतधारकांचे चेक बाउंस झाल्याने सुमारे 3 कोटी 5 लाख 39 हजार रुपये अद्याप वसूल झाले नाही. त्यामुळे थकबाकीपोटी जमा झालेले चेक बाउंस झाल्यानंतर पालिकेकडून संबंधितावर कोणतीही कारवाई केली नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वसामान्य कुटूंबातील नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. मात्र, काही निवासी व बिगर निवासी मिळकतधारक वर्षांनूवर्षे कर थकवित असून त्यांना नोटीस देण्यापलिकडे कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळेच अनेकदा मिळकतधारक कर भरण्याकडे दुर्लक्ष करु लागले आहेत.

सध्यस्थितीत महापालिकेने थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्याच्या नोटीस काढण्यास प्रारंभ केला आहे. येत्या आठ दिवसात थकबाकीदारांना मिळकत जप्तीची नोटीस देण्यात येतील. पण कर न भरल्यास जप्तीची कारवाई होत नाही. मार्चअखेर जास्तीत जास्त मिळकत कर भरावा म्हणून पालिकेच्या कर संकलन विभागाकडून जप्तीची मोहीम हाती घेतली जाते. या कारवाईत काहींजण वेळ टाळून नेण्यासाठी करसंकलन विभागाकडे थकबाकीपोटी चेक देतात. कालांतराने हे चेक बाउंस होवू लागले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या सन 2019-2020 या आर्थिक वर्षात 572 मिळकतधारकांनी धनादेशाद्वारे 3 कोटी 5 लाख 39 हजार रुपये जमा केले होते. मात्र, हे चेक बाउंस झाल्याने अद्यापही ही रक्कम वसुल झालेली नाही. तसेच यापुर्वी देखील प्रत्येक आर्थिक वर्षात धनादेशाद्वारे जमा केलेल्या रक्कमेतील किती चेक बाउंस झाले. त्याची वसुली पुर्ण झाली का?, अद्याप किती वसुली बाकी आहे. याबाबत करसंकलन विभागाकडे गोषवारा तयार नाही. त्यामुळे बाउंस झालेल्या चेकच्या रकमेकडे करसंकलन विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.

… तर फाैजदारी कारवाईचा प्रस्ताव विचाराधिन

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील मिळकतधारकांनी थकबाकीपोटी जमा केलेले चेक बाउंस करण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे करसंकलन विभागाने गांभिर्याने घेतले आहे. त्यामुळे चेक बाउंस करणा-यावर यापुढे फाैजदारी कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो आयुक्तांकडे विचाराधिन ठेवला आहे. चेक बाउंस झाल्यानंतर पहिल्यांदा संबंधिताना नोटीस पाठवून सात दिवसात थकबाकी भरण्याची सुचना करण्यात येईल. त्यानंतर कर न भरल्यास स्मरण नोटीस पाठविली जाईल. तरीही कर भरण्याकडे टाळाटाळ केल्यास फाैजदारी स्वरुपाचा गुन्हा आकुर्डी कोर्टात दावा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव करसंकलन विभागाने ठेवला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button