breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

आज मराठवाड्यातील काही भागांत विजेच्या कडकडाटसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज

मुंबईसह उपगनरात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आज 26 सप्टेंबरला मराठवाड्यातील काही भागांत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत सकाळपासून ऊन पडले असले तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे.याबाबतची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह परतीचा पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा अपेक्षित पाऊस झाला असून जुलै महिन्यात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या अखेरीस पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यंदा झालेल्या पावासामध्ये अनेक रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले. भिंती कोसळून घरांचे, इमारतींचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडले. जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या सगळ्यात अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध झाले, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button