breaking-newsआंतरराष्टीय

नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ

लंडन : भारतात बँकांची फसवणूक करणारा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लंडनमध्ये अटकेत असलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदी यांची काल कोठडी संपल्यानंतर ब्रिटनच्या न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला. दरम्यान, ईडीने त्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त करुन आधीच दणका दिला आहे.

 ईडीने नीरव मोदीची ३२९.६६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतल्या वरळीतील समुद्र महल या आलिशान बिल्डिंगमधील चार फ्लॅट, एक सी-साईड फार्म हाऊस, अलिबागमधली जमीन, जैसलमेरमधी पवन चक्की, लंडनमधील फ्लॅट, युएईमधला रेसिडेन्शियल फ्लॅट, शेयर आणि बँकमध्ये जमा असलेल्या रकमेचा समावेश आहे. जूनमध्ये मुंबईतल्या कोर्टाने नीरव मोदीची १,३९६ कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. 

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेचे १४ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झाला होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. तो  सध्या लंडनमधील वन्डस्वर्थ कारागृहात बंद आहे. मागील महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी देण्याचा आदेश दिला होता.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button