breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

CoronaVirus : कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलेच्या अनुभवाची व्हायरल पोस्ट

चीननंतर आता जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशात महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशी परिस्थिती असताना कोरोनाविषयी एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका महिलेने आपला अनुभव सांगितला आहे. ही महिला कोरोना व्हायरसपासून पूर्णपणे बरी झालेली आहे.

एलिझाबेथ स्नायडर असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सिएटल मधील रहिवासी आहे. फेसबुक पोस्टमध्ये कोरोनाची लागण झाल्यावर कोणती लक्षणे दिसली तसेच चाचण्या कशा प्रकारे केल्या या विषयी माहिती दिली आहे. फेसबुक पोस्टमध्ये एलिझाबेथने असं सांगितलं की , आजारपण टाळण्याासाठी लवकर वैद्यकीय चाचण्या केल्यास किंवा योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाण्याचे आावाहनसुद्धा केलं आहे.

https://www.facebook.com/EbethBerkeley/posts/10110434821081713

कोरोनातून आपण आता ती आता बरी झाली आहे. तिने आपली कामे सुरू केली असल्याचे या महिलेने सांगितले. या फेसबुक पोस्टला जवळपास २१००० लोकांनी शेअर केले असून, त्यावर ३००० कमेंट्स आल्या आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेत उपचार होणे आणि आवश्यक औषधांसह विश्रांती घेतल्यामुळे कोरोनातून बरे होऊ शकतो, असे एलिझाबेथने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button